कै.डाॕ.नानासाहेब मयेकर विद्यालय काजुर्ली येथे शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप
आबलोली (प्रतिनीधी).
मालगुंड एज्युकेशन सोसायटी संचालित कै.डाॕ.नानासाहेब मयेकर विद्यालय काजुर्ली (ता.गुहागर) येथील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.प्रत्येक वर्षी कोल्हापूर मधून येऊन प्रा.उमेश अपराध व मित्र परिवार हे शैक्षणिक साहित्य वाटप करतात.ग्रामिण भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे हाच तर जीवनातील खरा आनंद आणि जीवनाचा खरा अर्थ आहे.कर्तबगार मुलांच्या पाठिवरती जेव्हा शाबासकीची थाप पडते तेव्हा त्यांना प्रेरणा मिळते. प्रेम,प्रेरणा,प्रोत्साहन व आपुलकी अशी एक गोष्ट आहे, की ती आयुष्यभरासाठी पुरते.याच भावनेतून आम्ही हे कार्य करीत आहोत अशी भावना प्रा.उमेश अपराध यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुनिल मयेकर,सचिव विनायक राऊत,सह सचिव श्रीकांत मेहेंदळे,संचालक रोहित मयेकर व परेश हळदणकर,सल्लागार उमेश अपराध व नंदकुमार डिंगणकर,प्राचार्य डॉ.आर.जी.कुलकर्णी(कोल्हापूर),डॉ.उज्वल मुजुमदार,डॉ.रविंद्र पोर्लेकर, सुनील बेळेकर, काजुर्ली विद्यालयाचे मुख्याध्यापक आशिष घाग, जाकादेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन मोरे,माजी मुख्याध्यापक प्रकाश वंजोळे व हनुमंत कदम, सौ.सीमा लिंगायत(पोलीस पाटील काजुर्ली),सौ.मेघना मोहिते (सरपंच काजुर्ली),मुलू सुवरे (माजी उपसरपंच कोसबी),कैलास साळवी (स्थानिक शाळा समिती अध्यक्ष), चंद्रकांत खानविलकर (स्थानिक शाळा समिती सदस्य),काजुर्ली विद्यालय शिक्षक वृंद श्रीम.परविना तडवी,सौ.वैष्णवी पावरी तसेच मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.पल्लवी महाडिक यांनी केले व आभार प्रदर्शन सौ.वर्षा पवार यांनी केले.