वेळणेश्वर विद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा: वक्तृत्व स्पर्धा व माजी सैनिकांचा सत्कार!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वेळणेश्वर विद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा: वक्तृत्व स्पर्धा व माजी सैनिकांचा सत्कार!

 

वेळणेश्वर (प्रतिनिधी): सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, वेळणेश्वर विद्यालयामध्ये सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी ‘मेरा युवा भारत रत्नागिरी’ यांच्या पुढाकाराने २६ जुलै कारगिल विजय दिवसानिमित्त भव्य वक्तृत्व स्पर्धा आणि परिसरातील माजी सैनिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.Velneshr

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता झाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मोरे सर यांनी मेरा युवा भारत रत्नागिरीचे कार्यकर्ते श्री. सुनील जाधव व श्री. अनिकेत जाधव, तसेच माजी सैनिक श्री. बाळकृष्ण शिंदे, शालेय समिती सदस्य श्री. चैतन्य धोपावकर आणि पालक श्री. दत्तात्रय वावरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

वक्तृत्व स्पर्धेत ३१ विद्यार्थ्यांचा सहभाग

कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यालयातील जवळपास ३१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये साध्वी नाटेकर (इ.१० वी) हिने प्रथम क्रमांक, सांची धोपावकर (इ.१० वी) हिने द्वितीय क्रमांक, तर शामिली पावरी (इ.८ वी) हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच, सुरज वावरे, दिया देवळे व प्रियल कांबळे (तिघेही इ.१० वी) या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. मेरा युवा भारतचे कार्यकर्ते श्री. अनिकेत जाधव यांनी स्पर्धेचे उत्तम परीक्षण केले. विजेत्यांना शिल्ड, प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ असे बक्षीस देण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वातून भारतीय वीरांच्या शौर्यगाथा, कारगिल विजय दिवस आणि त्यावेळच्या युद्धातील प्रसंग प्रभावीपणे मांडले.

मार्गदर्शन व सत्कार सोहळा

कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना इयत्ता दहावीचे पालक श्री. वावरे यांनी कारगिल युद्ध का झाले, त्याची पार्श्वभूमी आणि भारत-पाकिस्तान संबंधांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. श्री. अनिकेत जाधव यांनी विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेचे महत्त्व सांगताना भारतीय वीरांचे स्मरण करणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित केले.

या वक्तृत्व स्पर्धेबरोबरच, मेरा युवा भारत रत्नागिरी यांच्यामार्फत परिसरातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील माजी सैनिक श्री. बाळकृष्ण शिंदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. सहाय्यक शिक्षक श्री. मांजरे सर यांनी श्री. शिंदे यांचा परिचय करून दिला.

मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मोरे सर यांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कलेचे कौतुक केले. त्यांनी सादर केलेली भाषणे आणि विषय खूपच सुंदररित्या मांडले असल्याचे सांगत, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत

या कार्यक्रमासोबतच, चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता ११ वी कॉमर्स शाखेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले आणि पेढा भरवून त्यांचे विद्यालयामध्ये स्वागत करण्यात आले.

या संपूर्ण कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इयत्ता ८ वी ते १२ वीचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चिले सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. लादे सर यांनी मानले.

 

#KargilVijayDiwas #VelaneshwarSchool #MyBharatRatnagiri #OratoryCompetition #ExServicemenFelicitation #EducationalEvent #RatnagiriNews

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

Leave a Comment

आणखी वाचा...