जि.प. पं. स. निवडणुकीत ‘करिष्मा’ दाखवून देऊ – शिवसेना शिंदे गट
४ सप्टेंबरला आबलोली येथे भव्य जाहीर मेळावा; मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशाचे संकेत
गुहागर: (संदेश कदम)..
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आपला करिष्मा दाखवून देऊ, असा स्पष्ट इशारा शिवसेना (शिंदे गट) चे तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर यांनी दिला आहे. अलिकडेच झालेल्या पक्षप्रवेशाच्या मेळाव्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद ही या निवडणुकीची नांदी असून, येत्या ४ सप्टेंबर रोजी आबलोली येथे होणाऱ्या जाहीर मेळाव्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रवेश करतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील शिवसेना पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधारी आमदारांवर निशाणा साधला. आपल्या पक्षप्रवेशाच्या मेळाव्यानंतर विद्यमान आमदारांना त्याच ठिकाणी मेळावा घ्यावा लागला. १२ वर्षांच्या एकत्र कामाच्या काळात पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांची त्यांनी कधीच दखल घेतली नाही. मात्र, यावेळी सौ. नेत्रा ठाकूर आणि महेश नाटेकर यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना लगेच मेळावा घ्यावा लागला, यावरून त्यांच्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असावी, अशी शंका कनगुटकर यांनी व्यक्त केली.
या पत्रकार परिषदेला तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर यांच्यासह युवा सेनेचे जिल्हा समन्वयक अमरदीप परचूरे, शहर प्रमुख निलेश मोरे, जिल्हा परिषद पडवे गटाचे युवा सेना उपतालुकाप्रमुख संदेश काजरोळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
#Guhagar #ZillaParishad #PanchayatSamiti #MaharashtraPolitics #ShivsenaShindeGroup #गुहागर #जिल्हापरिषद #पंचायतसमिती #राजकीयबातम्या #शिवसेनाशिं
देगट