मुख्यमंत्री सहाय्यता निधी ठरला जीवदान!
अहिल्यानगर जिल्ह्यात तीन महिन्यांत ४ कोटींची मदत; लाभार्थी म्हणतात – “ही योजना म्हणजे आशेचा किरण”
अहिल्यानगर, दि. ११ – अपघात, कॅन्सर, हृदयरोग, मणक्यांचे आजार, महागड्या ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया… अशा गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी खऱ्या अर्थाने जीवदान ठरत आहे. जिल्हा स्तरावर कक्ष सुरू झाल्याने मदत मिळण्याची प्रक्रिया जलद झाली असून, मागील तीन महिन्यांतच ५०० हून अधिक रुग्णांना तब्बल ४ कोटी रुपयांची मदत वितरित झाली आहे.
१ मे २०२५ रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात या वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन झाले. त्यानंतर केवळ २–५ दिवसांत निधी थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा होण्याची सोय सुरू झाली. सध्या जिल्ह्यातील १०५ नोंदणीकृत रुग्णालयांमधून हा लाभ मिळू शकतो.
—
लाभार्थ्यांचे अनुभव
राजेंद्र खरात, आळसुडे (कर्जत) – मांडीच्या सांध्याच्या ऑपरेशनसाठी १ लाखांची मदत; “सावकाराकडून कर्ज घ्यावे लागले नाही.”
सतीश जोरवेकर, अहिल्यानगर – मेंदूच्या उपचारासाठी ५० हजारांची मदत; “गरीबांपर्यंत योजनेची माहिती पोहोचावी.”
काकासाहेब फरताळे, मळेगाव (शेवगाव) – गुडघा ऑपरेशनसाठी ५० हजारांची मदत; “शेती गहाण ठेवण्याची वेळ आली नाही.”
भाऊसाहेब शेवाळे, वडगाव गुप्ता – पॅरॅलिसिस उपचारासाठी ५० हजारांची मदत; “मित्रांकडून उसने घ्यावे लागले नाही.”
—
योजना कशी मिळते?
प्रथम महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, धर्मादाय रुग्णालय मदत योजना यासारख्या योजनांचा लाभ दिला जातो. तो न मिळाल्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून थेट मदत मिळते.
—
📍 संपर्क ठिकाण – जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी
📞 अधिक माहिती – वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक अजय काळे
—
#मुख्यमंत्रीसाहाय्यतानिधी #अहिल्यानगर #यशकथा #जीवदान #आरोग्यसेवा #आशेचकिरण
—
—