🔥 पारगाव सुद्रिक गणातून शशिकांत एरंडे निवडणुकीच्या रिंगणात! 🔥
युवकांचा जबरदस्त पाठिंबा; नागवडे गटाकडून उमेदवारी निश्चित
अहिल्यानगर (वार्ताहर – नंदकुमार बगाडे पाटील) –
श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या पारगाव सुद्रिक गणातील ग्रामपंचायत निवडणुकीत सामाजिक युवा कार्यकर्ते शशिकांत कैलास एरंडे मैदानात उतरणार आहेत. सध्या ग्रामपंचायत सदस्य असलेले एरंडे हे राजेंद्र दादा नागवडे गटाशी घट्ट नाळ जोडून कार्यरत आहेत. नागवडे गटाकडून त्यांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.
एरंडे यांच्या मागे पारगाव, घारगावसह परिसरातील युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी आहे. सध्या ते झंझावाती दौरा काढून कार्यकर्त्यांशी संपर्क साधत आहेत. सामाजिक, धार्मिक आणि शासकीय योजनांचे फायदे सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. अतिक्रमण विरोधी ठराव ग्रामपंचायतीत मंजूर करून घेणे हे त्यांच्या कामगिरीत विशेष ठरले आहे.
राजेंद्र दादा नागवडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून एरंडे यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असून, आदेश शेठ नागवडे यांच्याही आदेशानंतरच ते अधिकृतपणे रिंगणात उतरणार आहेत.
गावातील सरपंच सौ. सुरेखा हिरवी, माजी उपसरपंच आदिनाथ खेतमाळीस, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत इथापे, राहुल दानवे, रघुनाथ दानवे, संजय कांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर एरंडे यांच्या पाठीशी आहेत. तर विजय कुसाळकर, अतुल दानवे, सागर मडके हे नागवडे गटाचे विश्वासू कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात आघाडीवर राहणार आहेत.
पारगाव सुद्रिक हे ‘द्राक्ष पंढरी’ म्हणून ओळखले जाणारे गाव असून, येथे नुकतेच श्रीक्षेत्र सुद्रिकेश्वर महाराज मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. परदेशी कारागिरांच्या कलाकुसरीने सुशोभित झालेले हे मंदिर गावाची शान वाढवत आहे. धार्मिक व राजकीय दृष्ट्या प्रभावशाली असलेल्या या गावाला राज्य सरकारचा ‘अ वर्ग’ दर्जा प्राप्त आहे.
—
#हॅशटॅग्स:
#पारगावसुद्रिक #शशिकांतएरंडे #श्रीगोंदातालुका #ग्रामपंचायतनिवडणूक #नागवडेगट #अहिल्यानगरराजकारण #सुद्रिकेश्वरमहाराज #द्राक्षपंढरी
📸 फोटो