चिपळूणमध्ये वनसंवर्धन व निसर्गरक्षणासाठी महायुती समन्वयक व निसर्गप्रेमींची वनअधिकाऱ्यांशी चर्चा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

🌿 चिपळूणमध्ये वनसंवर्धन व निसर्गरक्षणासाठी महायुती समन्वयक व निसर्गप्रेमींची वनअधिकाऱ्यांशी चर्चा 🌿

वनसंपदा जपण्यासाठी लवकरच निसर्गप्रेमींची संवाद बैठक

चिपळूण – चिपळूणमधील महायुती समन्वयक, व्यापारी बांधव आणि निसर्गप्रेमी सामाजिक कार्यकर्त्यांनी चिपळूणचे वन अधिकारी सौ. देसाई-पाटील यांची भेट घेऊन वने, वृक्षसंवर्धन, प्राणीजीव संरक्षण, सह्याद्री पर्वतरांगांचे निसर्ग संवर्धन, वृक्षलागवड आदी विषयांवर सखोल चर्चा केली.

या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना वन अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी लवकरच चिपळूण तालुक्यातील निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमी व सह्याद्री संवर्धन कार्यकर्त्यांची संवाद बैठक आयोजित करण्याचे ठरले. तसेच, या चर्चेतून निघालेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आमदार शेखर निकम यांच्यासोबत पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

या भेटीला माजी उपनगराध्यक्ष बापूसाहेब काणे, व्यापारी महासंघटना अध्यक्ष किशोरशेठ रेडीज, महायुती समन्वयक उदय ओतारी, निसर्ग व जलदूत शहनवाज शाह, निसर्गप्रेमी केसर देसाई, पर्यावरणप्रेमी अजित जोशी आणि पृथ्वी पवार यांनी उपस्थिती लावली.

 

 

#वनसंवर्धन #निसर्गप्रेम #चिपळूण #सह्याद्रीसंवर्धन #वृक्षलागवड #Ratnagiri #Konkan #Environment

📸 फोटो 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

Leave a Comment

आणखी वाचा...