🚦 गणेशोत्सवपूर्व आढावा बैठक : वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी
प्रांताधिकारी, तहसिलदार, पोलीस निरीक्षकांनी प्रत्यक्ष भेट देऊन करावे नियोजन
रत्नागिरी :
गणेशोत्सव काळात जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. विशेषतः संगमेश्वर आणि लांजा येथील पुलाच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहील यासाठी प्रांताधिकारी, तहसिलदार आणि पोलीस निरीक्षक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिल्या.
गणेशोत्सव २०२५ निमित्त पूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अपर पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, सहाय्यक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिंह यांनी सांगितले की, जिल्ह्यातील घाट रस्ते व महामार्गांवर वाहतूक मदत केंद्र, रुग्णवाहिका, जेसीबी, क्रेन यांची सोय केली जावी. राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवावेत, वळण रस्त्यांवर रम्बलर व वेग मर्यादा फलक बसवावेत, आपत्कालीन संपर्क क्रमांक व दिशादर्शक लावावेत. तसेच २४ तास फिरती गस्त पथके ठेवण्यात यावीत.
रिक्षा चालकांकडून अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाही, याची काळजी घेण्यासाठी परिवहन विभागाने पावले उचलावीत. मुंबई तसेच इतर शहरातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी जादा बसेसची व्यवस्था परिवहन मंडळाने करावी. तर गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी ठेवण्याची कार्यवाही होणार आहे.
🚔 गणेशोत्सवासाठी सुविधा केंद्रे :
मुंबई-गोवा महामार्गावर खालील ठिकाणी पोलीस मदत केंद्र कार्यरत राहणार –
खेड : हॉटेल अनुसया, हॅप्पी धाबा, भोस्ते घाट, भरणे नाका
चिपळूण : सवतसडा दर्शन, कळंबस्ते तिठा, बहादूरशेख नाका, अलोरे घाट माता, सावर्डे बाजारपेठ
संगमेश्वर : अरवली एसटी स्थानकाजवळ
देवरुख : मुरशी बावनदी पुलाच्या पलिकडे
रत्नागिरी : हातखंबा तिठा, पाली, बावनदी पुलाच्या अलिकडे, कोकजे वठार येथील नवीन पुलाजवळ
🔖 हॅशटॅग्स :
#गणेशोत्सव२०२५ #Ratnagiri #MumbaiGoaHighway #GanpatiTraffic #BreakingNews
—
📸 फोटो