जिद्द आणि विस्वास मनात आणले तर तुम्ही घडवाल इतिहास
ऍड.अनिकेत उज्ज्वल निकम
मुंबई – वसुंधरा फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी, उत्तर मध्य मुंबई जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दि.१० ऑगस्ट २०२५ गुरुद्वारा सभागृह, खार (पूर्व), मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.
याकार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एड. अनिकेत निकम भाजपा प्रदेश प्रवक्ते, अनिल गलगले जेष्ठ पत्रकार, सुहास आडिवरेकर भाजपा मुंबई उपाध्यक्ष, महेश पारकर भाजपा मुंबई चिटणीस, विरेंद्र म्हात्रे जिल्हाध्यक्ष उत्तर मध्य मुंबई, सुशम सावंत मा. जिल्हाध्यक्ष, अनिल आयकर ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष, शैलेश पाटील मंडळ अध्यक्ष खार सांताक्रूझ (पूर्व) नवनाथ दिघे वार्ड अध्यक्ष, प्रभाग ९४, लोकेश दवे माजी वार्ड अध्यक्ष, प्रभाग ९४, राजन आयकर मा.विधानसभा उपाध्यक्ष उपस्थित होते.
या प्रसंगी एड.अनिकेत निकम म्हणाले जेव्हा विषय देशाचा येतो तेव्हा आपण देशाचे जाज्वल्य अभिमान बाळगलाच पाहिजे. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत मातृभूमीवर कननिकन हा माझा आहे. वाहणाऱ्या प्रत्येक वाऱ्यांची जिद्द आणि विस्वास मनात आणले तर तुम्हीच घडवाल इतिहास. अनिल गलगले पत्रकार, सुहास आडिवरेकर मुंबई उपाध्यक्ष, महेश पारकर मुंबई चिटणीस यांची पण भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक राजेश दाभोळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अध्यक्ष विवेका दाभोळकर यांनी केले.