पाटपन्हाळे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पाटपन्हाळे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी दापोली येथील प्रा. शेषराज तिरपुडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. उपस्थित विद्यार्थ्यांनी ‘स्वराज संस्थापक कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक श्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हरहर महादेव’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देवून जयघोष केला.

यावेळी महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामाजिक व राजकीय जीवन कार्याचा आढावा घेत असताना शिवाजी महाराज यांच्या मावळयां मध्ये हिंदू , मुस्लिम असे सर्व धर्माचे लोक होते असे सांगून थोडक्यात आढावा घेतला. उपस्थित प्राध्यापकवृंद व विद्यार्थी यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिव साहिल आग्रे याने आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार, लढण्यातील गणिमीकावा, प्रजेची सुरक्षितता यातून विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असे सांगितले.

या कार्यक्रमाला सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रवीण सनये, प्रा. कांचन कदम, डॉ. सुभाष खोत, प्रा. लंकेश गजभिये, डॉ. दिनेश पारखे, प्रा. सुभाष घडशी, महावि‌द्यालयातील वरिष्ठ लिपिक मा. श्री. सुधीर टानकर, सौ. स्नेहल संसारे, ग्रंथालय परिचर श्री. परशुराम चव्हाण, श्री. संदिप चव्हाण, श्री. महेश झगडे व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी केले तर उपस्थित मान्यवर व श्रोते यांचे आभार प्रा. कांचन कदम यांनी मानले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

झिम्बाब्वेचा श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय; सुपर ८ मध्ये दिमाखदार प्रवेश

झिम्बाब्वेचा श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय; सुपर ८ मध्ये दिमाखदार प्रवेश   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
झिम्बाब्वेचा श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय; सुपर ८ मध्ये दिमाखदार प्रवेश

मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंचा तातडीचा निर्णय; तीन निष्ठावंतांना स्वीकृत नगरसेवकपद

मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंचा तातडीचा निर्णय; तीन निष्ठावंतांना स्वीकृत नगरसेवकपद   राज ठाकरे–एकनाथ शिंदे भेटीनंतर राजकीय हालचालींना वेग; पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना...
Read More
मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंचा तातडीचा निर्णय; तीन निष्ठावंतांना स्वीकृत नगरसेवकपद

पाटपन्हाळे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

पाटपन्हाळे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

बेलापूर बु. येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न

बेलापूर बु. येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न   बेलापूर बु. विविध कार्यकारी...
Read More
बेलापूर बु. येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी  विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न

जि.प.शाळा पूर्णगड न.१ शाळेत शिवजयंती उपक्रम उत्साहात संपन्न

जि.प.शाळा पूर्णगड न.१ शाळेत शिवजयंती उपक्रम उत्साहात संपन्न रत्नागिरी - जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ ता.जि.रत्नागिरी या शाळेत छत्रपती शिवाजी...
Read More
जि.प.शाळा पूर्णगड न.१ शाळेत शिवजयंती उपक्रम उत्साहात संपन्न

प्रथम वर्धापन दिन सोहळा: तवसाळ ग्रामदैवत श्री महामाई सोनसाखळी मंदिराचा उत्सव जल्लोषात

प्रथम वर्धापन दिन सोहळा: तवसाळ ग्रामदैवत श्री महामाई सोनसाखळी मंदिराचा उत्सव जल्लोषात तवसाळ, ता. गुहागर : तवसाळ गाव पंचक्रोशीचे जागृत...
Read More
प्रथम वर्धापन दिन सोहळा: तवसाळ ग्रामदैवत श्री महामाई सोनसाखळी मंदिराचा उत्सव जल्लोषात

गुहागर आगारात छ. शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती उत्साहात साजरी

गुहागर आगारात छ. शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती उत्साहात साजरी   पूजा आवळे चे भाषण लक्षवेधी आबलोली (संदेश कदम)...
Read More
गुहागर आगारात छ. शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती उत्साहात साजरी

फरहानचे वादळी शतक; पाकिस्तानचा नामिबियावर १०२ धावांनी दणदणीत विजय

फरहानचे वादळी शतक; पाकिस्तानचा नामिबियावर १०२ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
फरहानचे वादळी शतक; पाकिस्तानचा नामिबियावर १०२ धावांनी दणदणीत विजय

दुबेचे धडाकेबाज अर्धशतक, भारताचा नेदरलँड्सवर १७ धावांनी थरारक विजय; सलग १२ वा विश्वचषक विजयाचा विक्रम

दुबेचे धडाकेबाज अर्धशतक, भारताचा नेदरलँड्सवर १७ धावांनी थरारक विजय; सलग १२ वा विश्वचषक विजयाचा विक्रम   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :...
Read More
दुबेचे धडाकेबाज अर्धशतक, भारताचा नेदरलँड्सवर १७ धावांनी थरारक विजय; सलग १२ वा विश्वचषक विजयाचा विक्रम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नवे नेतृत्व : विवेक भीमनवार अध्यक्षपदी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नवे नेतृत्व : विवेक भीमनवार अध्यक्षपदी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लोकभवन येथील कॉन्फरन्स सभागृहात राज्यपाल आचार्य...
Read More
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नवे नेतृत्व : विवेक भीमनवार अध्यक्षपदी
Play sound