लाडकी बहीण योजनेवर राज यांची टीका, म्हणाले की जानेवारीत पगार द्यायला देखील याना अडचण येणारं….
अमरावती – लाडकी बहिण योजना सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी असतील तर त्याचे वाईट परिणाम होतील असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. अशा प्रकारे जर पैसे वाटत सुटले तर जानेवारीत कर्मचाऱ्यांना पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत, राजकीय स्वार्थासाठी जर अशा प्रकारे आपले राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर चुकीचे असल्याचे राज ठाकरे यांनी अमरावती येथे पत्रकारांशी अनौपचारीक गप्पा मारताना म्हटले आहे. समाजातील कोणताही घटक फुटक काही मागत नाही. अशा योजनेत पैसे वाटण्याऐवजी सरकारने महिलांना रोजगार देण्याचे काम करायला हवे असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.