वात्सल्य ट्रस्ट मुंबईच्या उपक्रमातून शैक्षणिक क्रांती – विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आशेचा किरण!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वात्सल्य ट्रस्ट मुंबईच्या उपक्रमातून शैक्षणिक क्रांती – विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आशेचा किरण!

✍️राजू सागवेकर/राजापूर

▪️ शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा मूलभूत आधार आहे, आणि याच ध्येयाने प्रेरित होऊन वात्सल्य ट्रस्ट, मुंबई गेली अनेक वर्षे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबवत आहे. २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून, श्री उमर नाईक यांच्या पुढाकाराने हा सामाजिक कार्याचा दीप उजळत आहे.

▪️ मिठगवाणे दशक्रोशीतील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना आवश्यक ती शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. या वर्षी अणसुरे आडभराडे प्राथमिक शाळेत सरपंच श्री रामचंद्र कणेरी यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री प्रमोद पडवळ गुरूजी, सहकारी शिक्षक विजय परब, श्री आचरेकर, तसेच व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

▪️ तसेच, मिठगवाणे नं. ३ शाळेतही उत्साहात साहित्य वितरण कार्यक्रम पार पडला. येथे व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अश्विन कुवेसकर, मुख्याध्यापिका सौ. मेश्राम मॅडम, व पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

 

▪️ वात्सल्य ट्रस्टचे स्थानिक विश्वस्त श्री उमर नाईक व दिवाकर आडविरकर गुरूजी यांनी परिसरातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना लवकरच साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. ग्रामीण भागातील शिक्षणाच्या प्रवाहाला गती देण्याच्या या प्रेरणादायी उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे.

 

▪️ शिक्षणाचा प्रकाश दूरवर पसरावा यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी श्री उमर नाईक, दिवाकर आडविरकर गुरूजी व वात्सल्य ट्रस्ट, मुंबई यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे.

Raju Sagvekar
Author: Raju Sagvekar

???? राजू सागवेकर ???? वार्ताहर (ग्रामीण ) - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ता.राजापुर - 416702

Leave a Comment

आणखी वाचा...