कै.सौ.आनंदीबाई कृ.गोखले माध्यमिक विद्यालय,धाऊलवल्लीचे राजापूर तालुका स्तरावरावरील तृणधान्य पाककलेत उज्वल यश

सौ. स्वरांगी सुधीर परांजपे ठरल्या द्वितीय क्रमांकाच्या मानकरी
राजापूर ✒️संदीप शेमणकर
राजापूर तालुक्यातील नामांकित हायस्कूल कै. सौ. आनंदीबाई कृष्णाजी गोखले हायस्कूल,धाऊलवल्लीच्या माता पालक सौ.स्वरांगी सुधीर परांजपे यांनी शाळा स्तरावर नाटे-आंबोळगड केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण तृणधान्य पाककलेत प्रथम क्रमांक पटकावला होता.तर सौ. प्राची प्रित्येश राजापकर यांचा द्वितीय व सौ.प्रांजली विश्वनाथ बाणे यांचा तृतीय क्रमांकाने विजयी झाल्या होत्या. व आत्ताच नुकत्या संपन्न झालेल्या केंद्र स्तरावरील प्रथम क्रमांकांची तालुका स्तरावर राजापूर मध्ये स्पर्धा संपन्न झाली होती.त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन (नाचणीचा केक) बनवून सौ. स्वरांगी सुधीर परांजपे यांनी तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून रुपये ५०००/- (पाच हजार रुपये)चे बक्षिस पटकावले आहे.त्यांनी धाऊलवल्ली कै. सौ. आनंदीबाई कृष्णाजी गोखले हायस्कूलचे नांव तालुका स्तरावर उज्ज्वल केले आहे.या सर्व स्पर्धकांचे गोखले हायस्कूल तर्फे आभार व्यक्त केले जात आहेत.कारण स्पर्धक असतात म्हणून स्पर्धा होते, व नंबर येतो.त्यामुळे जेवढा विजेत्यांचा सन्मान असतो तेवढाच सहभागी स्पर्धकांचाही तितकाच सन्मान असतो.धाऊलवल्लीतील अशा विविध गुण संपन्न अशा पालकांचा गोखले हायस्कूल मधील प्रत्येक उपक्रमांत उत्साहपूर्वक सहभाग असतो आणि त्यामुळेच गोखले हायस्कूलचे नांव नेहमीच शिखरावर असते.अशा या पालक वर्गाचे तसेच नाटे-आंबोळगड केंद्राचे अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले केंद्र प्रमुख श्री. सु.तु.जाधव सर यांचे संस्था,मुख्याध्यापिका,ग्रामस्थ व प्रशालेतील सर्व कर्मचारी वर्गातून गुणगान होत आहे व या विजया बद्दल सौ. परांजे यांचे विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.