देवगड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
श्री. सुरेश लाडोबा घाडी यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती
मुंबई – ✒️संदीप शेमणकर
देवगड तालुक्यातील मुक्काम – शेवरे ( ताबळवाडी )
पोस्ट – शिरगाव, तालुका – देवगड जिल्हा – सिंधुदुर्ग चे सुपुत्र श्री. सुरेश लाडोबा घाडी यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्या बद्दल समस्त देवगड तालुक्यातील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव व शुभेच्छा देण्यात येत आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या युवकाने उत्तम प्रकारे पोलीस दलात कामगिरी करत सहायक पोलिस उपनिरिक्षक पदापर्यंत यशाचे शिखर गाठले. त्याबद्दल देवगड तालुक्यातील समस्त ग्रामस्थ यांच्या माना उंचावल्या आहेत.