जि.प.प्राथमिक शाळा तळवली नं. 1 शाळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा. 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जि.प.प्राथमिक शाळा तळवली नं. 1 शाळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा. 

           तळवली( मंगेश जाधव)- कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ जावरे सर, उपशिक्षिका श्रीम. दिपीका दबडे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या मनिषाताई गमरे, संघमित्रा पवार, शिक्षणतज्ज्ञ ज्योतीताई गायकवाड मॅडम, आंगणवाडी सेविका मितांजली पवार मॅडम, सुहासिनी जाधव इ. मान्यवर व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. 

मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेतील इयत्ता दुसरी व तिसरीतील विद्यार्थिनीनी माता रमाई, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महान महिलांची वेशभूषा धारण केली होती. मनिषाताई गमरेनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक एकनाथ जावरे सरांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...