नेहरू युवा केंद्र रत्नागिरी मार्फत आंतरराष्ट्रीय महिला दिन संपन्न…

गुहागर – जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा , वेलदूर नवानगर मराठी येथे युवा केंद्र रत्नागिरी व महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन संपन्न झाला.त्यावेळी अध्यक्षस्थानी अंजनवेल केंद्राच्या केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम ह्या होत्या .तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद रत्नागिरी मा महिला व बालकल्याण सभापती स्मिताताई धामणसकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिल्पा कोळथरकर ,ग्रामपंचायत तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री शंकर कोळथरकर, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जांभारकर, उपाध्यक्ष संजना फूणगुसकर, मुख्याध्यापक मनोज पाटील, अंजली मुद्दमवार, सुषमा गायकवाड ,धन्वंतरी मोरे ,अफसाना मुल्ला, वेल्हाळ मॅडम, खामकर मॅडम, गावित मॅडम,, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्या माता पालक संघ ,शिक्षक पालक संघ पदाधिकारी ग्रामस्थ ,महिला व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे उद्घाटन स्मिताताई धामणस्कर मॅडम यांचे शुभहस्ते व मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.आरोही शिगवण यांनी प्रतिमा पूजन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी केले.त्यावेळी सर्व महिलांचा शाळा पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.स्मिताताई धामणस्कर मॅडम म्हणाल्या की महिला या आत्मनिर्भर झाल्या आहेत, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे, गावाचा विकास हा खऱ्या अर्थाने महिलांच्या हाती आहे, महिलांनी उत्तुंग अशी झेप घेतली आहे.त्यावेळी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली मुद्दमवार यांनी तर आभार प्रदर्शन सुषमा गायकवाड यांनी केले