ग्रामपंचायत बापर्डे येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न; तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन

ग्रामपंचायत बापर्डे येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न; तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन


बापर्डे: प्रतिनिधी प्रज्वल गायकवाड
ग्रामपंचायत बापर्डे येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अतिशय उत्साहात, दणक्यात आणि ग्रामस्थांच्या उस्फूर्त सहभागाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने १३, १४ आणि १५ ऑगस्ट रोजी सलग तीन दिवस विविध देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावात देशभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले.
सलग तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन
सोहळ्याची सुरुवात १३ ऑगस्ट रोजी झाली, ज्यामध्ये गावचे उपसरपंच श्री. गुणवंत राणे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी झेंडा फडकवण्याचा बहुमान चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल रोजी सर्वप्रथम घरपट्टी भरणारे माजी सैनिक श्री. बाबुराव राणे यांना देण्यात आला. अखेर १५ ऑगस्ट या मुख्य स्वातंत्र्यदिनी अतिशय दिमाखदार सोहळ्यात झेंडावंदनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. सरपंच श्री. संजय लाड यांच्या हस्ते मुख्य दिवशी झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला.
मान्यवरांची विशेष उपस्थिती
या तीन दिवसीय ऐतिहासिक सोहळ्यात गावातील सर्व स्तरांतील नागरिकांचा अतिशय उस्फूर्त आणि मोठा सहभाग पाहायला मिळाला. यामध्ये पंचायत समिती सदस्य सौ. संजना संजय लाड, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सुभेदार मेजर मराठा लाईफ इन्फंट्री श्री. प्रदीप मिसाळ, सरपंच श्री. संजय लाड, उपसरपंच श्री. गुणवंत राणे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. संदीप नाईक धुरे, पोलीस पाटील नितीन नाईक धुरे, सोसायटी चेअरमन श्री. अजित राणे, ज्येष्ठ नागरिक श्री. बाबुराव राणे, डॉ. चित्रा पाटील, आणि श्री. जीवन नाईकधुरे हे सर्व मान्यवर आवर्जून उपस्थित होते. तसेच गावातील सर्व महिला बचत गटांचे प्रतिनिधी, सर्व अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्राम विस्तार अधिकारी श्री. गुणावत यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.
सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य ‘विजयाची रॅली’
झेंडावंदनानंतर शाळेतील मुलांसाठी विविध वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तदनंतर, यशवंतराव राणे माध्यमिक विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर आणि विविध कलांचे दर्शन घडवणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या सर्व सुंदर कार्यक्रमांनंतर गावातील सर्व शाळा, हायस्कूलमधील मुले, शिक्षक वर्ग आणि गावातील तमाम ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण गावातून एक भव्य ‘विजयाची रॅली’ काढली, ज्याने संपूर्ण वातावरणात देशभक्तीचा एकच जल्लोष निर्माण केला. कार्यक्रमात गावातील सर्व शाळांचे विद्यार्थी व शिक्षक वर्ग तसेच यशवंतराव राणे माध्यमिक विद्यामंदिरचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग यांनी संपूर्ण कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
आभार प्रदर्शन
कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायत सरपंच श्री. संजय लाड यांनी या तीन दिवसीय स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहून शोभा वाढवणाऱ्या तसेच हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपला बहुमूल्य हातभार लावणाऱ्या गावातील सर्व स्तरांतील लोकांचे, माता-भगिनींचे आणि उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. विशेष करून, कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक वर्गाचे त्यांनी कौतुक केले. याशिवाय, यशवंतराव राणे माध्यमिक विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक श्री. गुरव सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीबद्दल व सहकार्याबद्दल सरपंच महोदयांनी त्यांचे विशेष आभार मानले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

भरत गोगावले रायगडचे नवे पालकमंत्री; शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य  : पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महाडसह रायगडमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून जल्लोष; जिल्ह्याच्या विकासाला वेग मिळण्याची अपेक्षा

Horoscope

Weather

और पढ़ें

भरत गोगावले रायगडचे नवे पालकमंत्री; शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य  : पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महाडसह रायगडमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून जल्लोष; जिल्ह्याच्या विकासाला वेग मिळण्याची अपेक्षा

राज्य

शहर चुनें