???? कोंडीये गावाची कन्या वकील झाली!
शेती करणाऱ्या घरातून शिक्षणात झेप; कु. कल्पना धोंडू दसम यांचे मोठे यश
संगमेश्वर (वार्ताहर) – कोंडीये गावातील कु. कल्पना धोंडू दसम हिने ३ वर्षांचा वकीली अभ्यासक्रम पूर्ण करून यशस्वीरीत्या वकीली परीक्षा उत्तीर्ण केली असून, तिने केवळ आपल्या आईवडिलांचे नव्हे तर संपूर्ण गावाचे व समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे.
कु. कल्पनाचे वडील श्री. धोंडू शिवराम दसम हे शेती व्यवसायात असूनही घरातील बेताची परिस्थिती, आर्थिक आव्हाने या सर्व गोष्टींना तोंड देत कल्पनाने आपल्या शिक्षणात सातत्य ठेवले. तिच्या जिद्दीला व आईवडिलांच्या पाठिंब्याला अखेर यश आले.
कोंडीये गावातील दसम भावकितील व कुणबी ओबीसी समाजातील पहिली वकिल म्हणून कु. कल्पना या टप्प्यावर पोहोचल्या आहेत. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
???? कु. कल्पनाला ‘कुणबी समाजा’तर्फे हार्दिक अभिनंदन व उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा! ????
—
???? हॅशटॅग्स:
#कोंडीयेगाव #कल्पनादसम #वकिलबनली #OBCयशकथा #कुणबीगौरव #संगमेश्वर #महिलासशक्तीकरण #Inspiration
—
???? फोटो