कबुतरखाना आंदोलन प्रकरणी १५० आंदोलकांविरोधात गुन्हा!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🟣 कबुतरखाना आंदोलन प्रकरणी १५० आंदोलकांविरोधात गुन्हा!

 

महिलांचा मोठा सहभाग; ताडपत्री फाडून बांबू उखडले, पोलिसांचा तत्पर हस्तक्षेप

 

मुंबई :

दादर येथील कबुतरखाना आंदोलनाने रंग घेतला असून तब्बल १५० आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये ५० हून अधिक महिलांचा सहभाग होता.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने कबुतरखाना ताडपत्री व बांबू लावून बंद केला होता. मात्र, ६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता काही पक्षीप्रेमी व जैन समाजातील नागरिकांनी बेकायदेशीर जमाव जमवून थेट कबुतरखान्यावर धडक दिली.

संतप्त महिलांनी ताडपत्री चाकूने फाडून बांबू उपसून काढले, रस्सी कापली तसेच महिला पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

याप्रकरणी दंगल करणे, जमाव जमवणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान, चाकूचा वापर करून गोंधळ घालणे व कायदा सुव्यवस्था बिघडवणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडून तक्रार न आल्याने अखेर पोलिसांनी स्वतःच गुन्हा नोंदवला.

दरम्यान, दादर पोलिसांनी आंदोलकांची ओळख पटवून पुढील तपास सुरू केला आहे.

 

 

 

📌 हॅशटॅग्स :

#मुंबई #कबुतरखाना #दादर #आंदोलन #BreakingNews #MumbaiPolice

 

 

 

📸 फोटो

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...