एमकेसीएलच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

एमकेसीएलच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम)

महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड एमकेसीएल गेली 24 वर्ष महाराष्ट्रातील कोट्यावधी विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक डिजिटल शिक्षण व कौशल्य विकास पोचवण्याचे कार्य सातत्याने करत आहे समाजातील डिजिटल दरी दूर करण्याच्या कार्यात उल्लेखनीय संपादन केलेले आहे एमकेसीएलने आपल्या स्थापनेची 24 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केली असून एमकेसीएलच्या 25 व्या स्थापना दिनाची औचित्य साधून गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विशेष कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) रौप्य महोत्सव स्थापना दिनानिमित्त पुणे येथे विशेष कार्यक्रमाचे लाईव्ह वेबकास्टचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम पुणे येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला या कार्यक्रमाला एमकेसीएलचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, प्रमुख पाहुणे महाराज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, चंद्रकांत पाटील दिलीप वळसे पाटील, आशिष शेलार, महासंगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर आधी उपस्थित होते. त्यांचे विचार थेट प्रक्षेपणाद्वारे सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. त्यानंतर आबलोली महसूलचे मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर, महसूल अधिकारी विनोद जोशी, जिल्हा परिषद शाळा खोडदेच्या प्रीती गावडे, काजुर्लीच्या विजया मेस्त्री, सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीच्या संचालिका सौं. सावी साळवी आदी. मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विद्यार्थ्यांना एम एस सी आय टी कोर्स चे सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला आबलोली पंचक्रोशीतील विद्यार्थी पालक बहुसंख्येने उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीच्या संचालिका सौं. सावी साळवी, साक्षी सावंत, शुभम सावंत, सिद्धी डिंगणकर त्यांनी विशेष प्रयत्न केले शेवटी सौ. सावी साळवी यांनी सर्वांचे आभार मानले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...