राज्यातील १८०० भजनी मंडळांना मिळणार २५ हजारांचे अनुदान
गणेशोत्सव राज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना मदतीची मोठी घोषणा
मुंबई : यावर्षी गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील भजनी मंडळांना आर्थिक मदत म्हणून २५ हजार रुपयांचे भांडवली अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
राज्यातील १८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी हे अनुदान देण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत संस्थांना नेहमीच आर्थिक सहाय्य केले जाते.
१४ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयानुसार, नोंदणीकृत तसेच भजन क्षेत्रातील शिखर संस्थांनी प्रमाणित केलेल्या मंडळांना हे भांडवली अनुदान मिळणार आहे. या संदर्भातील अटी व शर्तींचा स्वतंत्र शासन निर्णय लवकरच निर्गमित होणार आहे. यासाठी सरकारने तब्बल ५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
भजनी मंडळांना २५ हजार रुपयांचे अनुदान मिळवण्यासाठी https://mahaanudan.org या संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २३ ऑगस्ट २०२५ ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत उपलब्ध राहणार आहे.
भजनी मंडळांनी या योजनेचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
—
🟢 हॅशटॅग्स :
#भजनीमंडळ #गणेशोत्सव२०२५ #महाराष्ट्र #अनुदान #AshishShelar #CulturalMaharashtra
📸 फोटो