साटवली ग्रामपंचायतीचे अपंगांवर अन्याय? लाखो रुपयांची अपंग व्यावसायिक गाळ्यांची इमारत झाडीझुडपांत धुळखात; ग्रामपंचायत व सदस्यांवर सामाजिक कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

साटवली ग्रामपंचायतीचे अपंगांवर अन्याय?

लाखो रुपयांची अपंग व्यावसायिक गाळ्यांची इमारत झाडीझुडपांत धुळखात; ग्रामपंचायत व सदस्यांवर सामाजिक कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप


लांजा तालुक्यातील साटवली बाजारपेठेत जिल्हा परिषद रत्नागिरीच्या अपंग कल्याण निधीतून २०१७-१८ मध्ये सुमारे २.३५ लाख खर्चून अपंग व्यावसायिक गाळ्यांची स्लॅब इमारत बांधली; मात्र २०१८ पासून आजतागायत एकाही अपंग व्यक्तीस दिली नाही. इमारत झाडीझुडपांनी वेढलेली, धुळखात पडलेली असून ग्रामपंचायत व वॉर्ड सदस्यांकडून मुद्दाम दुर्लक्ष केल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप.

लांजा प्रतिनिधी (जितेंद्र चव्हाण):

लांजा तालुक्यातील साटवली बाजारपेठेत अपंग बांधवांसाठी उभारण्यात आलेली लाखो रुपयांची इमारत आज झाडीझुडपांत वेढलेली, धुळधाण झालेली, वापराविना पडून आहे. ग्रामपंचायतीने या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा साटवली गावातील सामाजिक कार्यकर्ते अविनाश पावसकर यांचा गंभीर आरोप आहे.

जिल्हा परिषद, रत्नागिरीच्या अपंग कल्याण निधी (७५ टक्के भांडवली) सन २०१७-१८ अंतर्गत

“ग्रामपंचायत साटवली, ता. लांजा येथे अपंग व्यापारी गाळे बांधणे” या नावाने हे काम मंजूर झाले.

या कामासाठी अंदाजे २,३५,००० रुपये खर्च दाखविण्यात आला असून कार्यान्वित यंत्रणा – माननीय कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद रत्नागिरी अशी नोंद आहे.

सदर अपंग व्यापारी गाळ्यांची स्लॅब इमारत २०१८ साली पूर्ण झाली. मात्र,

या इमारतीत एकाही अपंग व्यक्तीस व्यावसायिक गाळा देण्यात आला नाही,

इमारतीची साफसफाई, देखभाल, ताळेबंद काहीच नाही,

संपूर्ण इमारत आज झाडीझुडपांनी वेढलेली, दूरूनही इमारत दिसेनाशी झालेली आहे.

गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभेत वारंवार हा विषय उपस्थित करूनही,

साटवली ग्रामपंचायत,ग्रामपंचायत सरपंच,तसेच संबंधित वॉर्ड मधील ग्रामपंचायत सदस्य

यांनी या गंभीर विषयाकडे कानाडोळाच केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सामाजिक कार्यकर्ते अविनाश पावसकर म्हणाले,

> “अपंगांसाठी खास करून ही स्लॅब इमारत बांधण्यात आली. शासनाचा निधी खर्च झाला, पण प्रत्यक्षात एकाही अपंग बांधवाला या गाळ्यांचा लाभ दिला गेला नाही. इमारत उभी केली आणि निधी खर्च झाला, एवढंच! उपयोग शून्य. हा सरळसरळ शासन निधीचा अपव्यय आणि अपंग बांधवांवर अन्याय आहे.”

त्यांनी पुढे आरोप केला की,

सदर इमारतीची स्वच्छता, साफसफाई, तटबंदी, सुरक्षितता याबाबत ग्रामपंचायतीकडून कोणतीही कारवाई होत नाही,

ग्रामस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही ग्रामपंचायत आश्वासन देऊन विसरते,

वॉर्ड सदस्यांकडे तक्रार करूनही ते मुद्दाम कानाडोळा करत आहेत.

पावसकर यांचे म्हणणे आहे की,

> “अपंग व्यावसायिक गाळ्यांचे हे काम पूर्ण होऊन तब्बल काही वर्षे उलटली, पण आजपर्यंत ते प्रत्यक्ष वापरात आले नाही. शासनाकडून मिळालेला अपंग कल्याण निधी कागदावरच दाखवण्यासाठी वापरला गेला, प्रत्यक्ष अपंगांसाठी नव्हे, अशी स्थिती आहे.”

ग्रामस्थांत त्यामुळे रोष पसरला असून,सदर इमारत तातडीने स्वच्छ करून,व्यवस्थित नोंदणी करून,पात्र अपंगांना गाळे वाटप करावेत,अनियमिततेचा मागोवा घेऊन चौकशी करावी

अशी जोरदार मागणी स्थानिक पातळीवरून केली जात आहे.

 

२०१८ पासून आजपर्यंत धुळखात पडलेल्या या इमारतीकडे आता तरी जिल्हा परिषद, अपंग कल्याण विभाग व तहसील प्रशासन लक्ष देणार की नाही, याकडे साटवली ग्रामस्थांसह लांजा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा