शिंदे यांचा पटोलेंना टोला: “बाप बापच असतो, पटोलेंचा हा प्रसिद्धी स्टंट!”

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिंदे यांचा पटोलेंना टोला: “बाप बापच असतो, पटोलेंचा हा प्रसिद्धी स्टंट!”

नाना पटोलेंच्या निलंबनानंतर एकनाथ शिंदेंनी साधला निशाणा

मुंबई ~ आज विधानसभेतील गदारोळानंतर विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित केले. या कारवाईच्या निषेधार्थ विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्यांच्या एका वक्तव्याबद्दल विचारले असता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

एकनाथ शिंदे म्हणाले, “हो, बाप बापच असतो, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. नाना पटोलेंनी हा स्टंट प्रसिद्धीसाठी केला, कारण दिल्लीत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींमध्ये आता त्यांचं नाव कुठेच दिसत नाही.”

शिंदे पुढे म्हणाले की, “नाना पटोले स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांना विधानसभेचे कामकाज आणि सभागृहाची प्रतिष्ठा कशी राखायची हे माहीत आहे. पण ते आज इतके आक्रमक का झाले, हे कळले नाही. ते थेट अध्यक्षांच्या दिशेने गेले आणि त्यांनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून अशा कृतीची अपेक्षा नव्हती. दिल्लीतही काही दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा दिसत नव्हती. त्यामुळे, पुन्हा चर्चेत आणि प्रकाशझोतात येण्यासाठीच त्यांचे हे प्रयत्न आहेत का? म्हणूनच त्यांनी पुन्हा मोदींचेच नाव घेतले पाहिजे. विधानसभेत जनतेने दिलेले झटके आणि काँग्रेस १६ वर कसे अडकले, यातून त्यांनी बोध घेतला पाहिजे.”

 

#Hashtags:

#EknathShinde #NanaPatole #MaharashtraPolitics #VidhanSabha #PoliticalDrama #MahaVikasAghadi #BJP #Congress #MaharashtraNews #शिंदेनानाटोला #महाराष्ट्रराजकारण #विधानसभा #राजकीयनाट्य #एकनाथशिंदे #नानापटोले

Sujit Surve
Author: Sujit Surve

Sujit surve * Ratnagiri vartahar* Digital news Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...


error: Content is protected !!