पांगारी ग्रामपंचायत आणि कृषी दुतांचा स्तुत्य उपक्रम- पांगारी येथे कृषी दिन उत्साहात साजरा
आबलोली (संदेश कदम)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय खरवते – दहिवली येथील चतुर्थ वर्षातील कृषी दुत आणि पांगारी ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामिण उद्यानविद्या कार्यानुभव २०२५ – २६ या कार्यक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील पांगारी गावामध्ये कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यामध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी डॉ. ओंकार निर्मल, प्रा. अंबरीश हत्तळ्ळी, प्रशासक रायचंद हरिदास गळवे, ग्रामपंचायत अधिकारी डोलारे, सी. ए. अनिल वने, माजी सरपंच पांडुरंग दौलत खांबे, माजी सरपंच विष्णू दाजी वीर, शूरसेन जाधव, माजी प्राध्यापिका सौ. खांबे, मुख्याध्यापक सोनावणे, ग्रा. पं. माजी सदस्या सौ. विद्या दिनेश खांबे,संदिप जाधव, अंगणवाडी सेविका यांचेसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी कृषी दुत अवकाश बेर्डे, यश राठोड,साहिल जाधव, साहिल मोडके, अब्दुलमुईज ऐनरकर, पियुष रोकडे यांनी कृषी दिनी विशेष मेहनत घेऊन सहकार्य केले

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.