जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तिडे आदिवासीवाडी शाळेत ” हर घर तिरंगा उपक्रम तसेच स्वातंत्र्य दिन ” उत्साहात साजरा.
मंडणगड, प्रतिनिधी.
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तिडे आदिवासीवाडी,तालुका मंडणगड या शाळेत दिनांक २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत केंद्रपुरस्कृत “हर घर तिरंगा अभियान” तसेच “भारतीय स्वातंत्र्य दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले.यामध्ये प्रभातफेरीचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली तसेच चित्रकला स्पर्धा,रंगभरण स्पर्धा,समूहगीत गायन,वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे यासाठी वाडीतील रस्त्यांची स्वच्छता हा उपक्रमही घेण्यात आला.स्वातंत्र्य दिनी प्रभातफेरी काढण्यात आली. तिडे गावचे माजी पोलीस पाटील दत्ताराम हिलम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत तसेच “हा देश माझा” या देशभक्तीपर गीताचे सामुहिक गायन करण्यात आले. तद्नंतर वक्तृत्व स्पर्धा ,पाढे पाठांतर स्पर्धा घेण्यात आली.शाळेतील सहशिक्षक संतोष पोस्टुरे , मुख्याध्यापक निलेश लोखंडे तसेच अंगणवाडी सेविका स्वप्नाली जाधव यांनी स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती सांगितली. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला शा.व्य. समिती अध्यक्ष व सदस्य,वाडी अध्यक्ष व सदस्य, महिला मंडळ,आजी माजी पोलीस
पाटील,अंगणवाडी सेविका, मदतनीस,वाडीतील ग्रामस्थ,शाळेतील स्वयंपाकी व मदतनीस,आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश लोखंडे यांनी केले तर संतोष पोस्टुरे सर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.