गुहागर तालुका शिक्षक क्षमता गुहागर तालुका शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाला शिक्षणाधिकारी (योजना) श्री किरण लोहार साहेब यांची भेट
गुहागर -जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था रत्नागिरी आयोजित तिसऱ्या टप्प्यातील गुहागर तालुका शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण केंद्राला, जिल्हा परिषद रत्नागिरीचे योजना शिक्षणाधिकारी माननीय श्री किरण लोहार साहेब यांनी भेट दिली व प्रशिक्षण कामकाजाचा आढावा घेतला, त्यावेळी गुहागरचे गटशिक्षण अधिकारी श्री रायचंद गळवे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र संचालक श्री विश्वास खर्डे साहेब, विषय शिक्षक श्री परमेश्वर लांडे ,विषय शिक्षक श्री शिवानंद साखरे, तज्ञ मार्गदर्शक श्री विजय पिसाळ सर ,श्री सुनील गुडेकर सर, श्री सुभाष रणे सर ,श्री दिलीप माणगावकर सर, प्रदीप जाधव सर, मनोज पाटील सर विजय आखाडे सर व तज्ञ मार्गदर्शक सर्व शाळांचे मुख्याध्यापक व 150 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते
.गटशिक्षणाधिकारी श्री रायचंद गळवे साहेब यांचे शुभहस्ते श्री किरण लोहार साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या मार्फत स्वागत करण्यात आले.शिक्षण अधिकारी (योजना) श्री किरण लोहार साहेब म्हणाले की शिक्षकांच्या क्षमता वृद्धीसाठी प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत खूपच बदल होणार आहे.
विद्यार्थ्यांना वैश्विक नागरिक घडविण्यासाठी होऊ घातलेले बदल व बदललेली मूल्यमापन व मूल्यांकन प्रक्रिया, बदललेलं आकृतीबंध, परीक्षा पद्धतीत झालेले बदल आपण समजून घेतले पाहिजे.
अध्ययन अध्यापन क्रिया ही क्षमताचिष्ठित होणे गरजेचे आहे ,त्यांनी विविध उदाहरणाद्वारे सर्व प्रशिक्षणार्थ्यांना शैक्षणिक पार्श्वभूमीपासून ते आताच्या शिक्षण व्यवस्थेपर्यंत प्रदीर्घ मार्गदर्शन केले.कनिष्ठ महाविद्यालय येथे संपन्न झालेल्या या मार्गदर्शन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मनोज पाटील यांनी केले